Top News

अविनाश दोरखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप #Rajura

घरकाम करणाऱ्या महिलांना छत्रीचे केले वाटप.
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्‍था शाखा राजुरा,नेफडो तथा माजी विद्यार्थी संघ व श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने अविनाश दोरखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या तर्फे घरकाम करणाऱ्या महिलांना छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अविनाश जाधव, सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा तथा माजी जि. प. सदस्य यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून साजिद बियाबानी, कोषाध्यक्ष, आ. शी. प्र. मं., डॉ. संभाजी वरकड, प्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा, डॉ. राजेश खेरानी, उपप्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा, डॉ. संतोष देठे,  समन्वयक, माजी विद्यार्थी संघ, अल्का दिलीप सदावर्ते,  नागपूर विभाग अध्यक्ष,  राष्ट्रीय,कला साहित्य व संस्कृती विकास समिती, विजय जांभुळकर, नागपूर विभाग अध्यक्ष नेफडो, संतोष देरकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, नेफडो, अविनाश दोरखंडे, तालुका संघटक नेफडो तथा अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ, संजय दोरखंडे, सी. ओ. रंगनाथ स्वामी पतसंस्था मर्या. आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. अविनाश दोरखंडे यांनी वाढदिवस निमित्याने घरकाम करणाऱ्या महिलांना छत्री चे वाटप केले. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. वृक्षप्रतिज्ञा बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो यांनी घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुयोग साळवे यांनी केले तर प्रास्ताविक बादल बेले यांनी केले. आभार प्रा.मनीष पोतनूरवार यांनी मानले. घरकाम करणारी महिला आशा सहारे यांनी या छत्री वाटप उपक्रमाचे कौतुक केले व अविनाश दोरखंडे यांनी अतिशय चांगला व प्रेरणादायी उपक्रम घेऊन अगदी पावासाला सुरुवात झाली असून  योग्य वेळी योग्य वस्तू देऊन आम्हच्या कार्याची दखल घेतल्या बद्द्दल दोरखंडे यांचे आभार व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी अविनाश दोरखंडे यांच्या कार्याचे कौतुक करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने