Top News

अखेर......! रस्त्यावर पडलेले खड्डयाची दुरुस्ती sindewahi


चिमुर-सिंदेवाही, सिंदेवाही-मोहाळी, चिमुर-मुल बससेवा सुरु
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील वासेरा-गडबोरी हे दोन्ही गावे तालुक्यापासुन ११ किमी अंतरावर आहेत. या दोन्ही गावांचा थेट संपर्क तालुक्याशी दैनंदिन पडत असतो. याच मार्गावर वासेरा जवळ नागोबा मंदिर परिसरात बांधकाम विभागाने रस्त्यावर लहान पुल तयार केला होता. परिसरातील जड वाहतुकीमुळे पुलाच्या आतील सिमेंट पाईप फुटल्यामुळे ठिकठिकाणी भगदाड पडले होते. याची बातमी दैनिक पुण्यनगरीने लावुन धरली होती. बातमी प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभाग कामी लागले.
सदर पुलाचे काम शेतकर्याच्या शेतातील पाणी त्या बाजुला नेणे होते. पण पाईप फुटल्यामुळे गाळ जमा होवुन पाणी वाहणे बंद झाले होते. पर्यायी शेतकर्याच्या शेतात पाणी साचुन पळे खराब होण्याच्या मार्गावर लागले होते. भगदाड पडल्यामुळे परिसरातील बससेवा बंद झाली होती.
बांधकाम विभागाने वृत्ताची दखल घेत पावसामध्ये जुणे पाईप पुर्णपणे जेसिबीच्या साहाय्याने खोदुन काढले. यासाठी ३ तास वाहतुक बंद करण्यात आली होती. जुने पाईप १५ वर्षे जुणे व पातळ स्वरुपाचे होते. या बदल्यात बांधकाम विभागाने ३ मोठे सिमेंटचे पाईप टाकुन बुजविण्यात आले. पाऊस खुपच सुरु असल्यामुळे बुजवितांना मातीचा चिखल झाला पण त्यावर मुरुम, गिट्टी व छोटे दगड टाकुन बुजविण्यात आले. व वाहतुक सुरु करण्यात आली. आजच्या घडीला परिसरातील सर्वच बससेवा सुरु झाल्या आहेत.
       या एकट्या लहान पुलामुळे या परिसरातील चिमुर-सिन्देवाही, सिन्देवाही-मोहाळी, चिमुर-मुल या ३० ते ४० गावांना जोडणार्या बससेवा प्रभावित झाल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व नागरिकांची प्रवासाची तारांबळ सुरु झाली होती. याची मौखिक माहिती ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी कॅबिनेट मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांना देण्यात आली होती. त्यांच्या सहकार्याने चिमुर आगार व ब्रम्हपुरी आगार यांनी बससेवा त्वरीत सुरु केली.
          नेमके पावसाळ्याच्या दिवसात अशा घटना घडत असतात यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने परिसरातील रस्त्यांचा सर्व्हेक्षण करुन उन्हाळ्यातच अशा प्रकारची डागडुगी व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जेणेकरून अडचणीच्या काळात विद्यार्थ्यांना व नागरिकांना मानसिक प्रताडणा होणार नाही अशी प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी बससेवा सुरु झाल्यामुळे सबंधीत विभागाचे व प्रतिनिधींचे आभार मानले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने