Top News

नगरसेवकांनी स्वखर्चातून केली प्रभागात धूर फवारणी #chandrapur#pombhurna


सतत नगरपंचायतला मागणी करुनही होत होते दुर्लक्ष?
पोंभूर्णा:- पोंभुर्णा शहरातील अनेक प्रभागात डासामुळे बेजार झालेल्या नागरीकांना दिलासा देण्याचा प्रयत्न येथील नगरसेवक आशिष कावटवार,अतुल वाकडे व अभिषेक बद्दलवार यांनी केला. सतत पाऊस पडत असल्याने डासामुळे अनेक आजार डोकेवर काढत असताना नगर पंचायत मधिल सर्वसाधरण सभेत शहरात धुर फवारणी करण्याचा सर्वानुमते ठरवण्यात आले.
परंतू नगरप्रशासन या गंभीर आरोग्य विषयाकडे दुर्लक्ष करित वेळ मारुन नेण्याचा काम करीत आहे.त्यामूळे विरोधी पक्षनेता आशिष कावटवार,नगरसेवक अतुल वाकडे व अभिषेक बद्दलवार यांनी नगर पंचायत स्व:ता करु शकत नसेल तर फॉगिंग मशीन भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचा निवेदन देण्यात आला. व वारंवार मागणीची दखल न घेतल्याने नगरसेवकांनी आपल्या स्वखर्चाने आपल्या प्रभागातील प्रत्येक गल्लीत धूर फवारणी करण्याचा संकल्प या तिन नगरसेवकांनी केला.
‘माझा प्रभाग , माझी सामाजिक जबाबदारी’केलेल्या कार्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. पावसाचे दिवस यातच डासांचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात आजाराने चांगलेच डोके वर काढले होते. शहरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना नगर पंचायत मध्ये चार फॉगिंग यंत्र धुळ खात आहे. लवकरात लवकर संपुर्ण शहरात फवारणी करावी अशी ह्या नगरसेवकांनी मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने