Top News

जि .प. उच्च प्राथमिक शाळा दिघोरी (पोंभुर्णा) येथे शालेय बालपंचायत स्थापन #pombhurna


निवडणुक प्रक्रियेच्या माध्यमातुन बालपंचायत स्थापन

निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मोबाईल EVMचा वापर
पोंभुर्णा:- मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूरच्या सहकार्याने शालेय मुलांना देशातील निवडणूक पध्दतीची माहिती व्हावी या उद्देशाने तसेच मतदान जनजागृतीसाठी शालेय बालपंचायत निवडणूक घेण्यात आली.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे सर तसेच तालुक्याचे क्लस्टर मॅनेजर हिराचंद रोहनकर सर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 22 जुलै 2022 रोजी जि.प. उच्च प्राथमिक शाळा दिघोरी येथे निवडणुक पध्दतीने शालेय बालपंचायत स्थापन करण्यात आली.या निवडणूक प्रक्रियेत प्रामुख्याने उमेदवारी अर्ज भरणे,माघार घेणे,प्रचार करणे,प्रत्यक्ष मोबाईल EVM चा मतदान करण्यासाठी वापर या प्रक्रियेच्या माध्यमातुन शालेय बालपंचायत निवडणुक पार पडली.
शालेय बालपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्याध्यापक श्री. युवराज गेडाम सर , नीलेश उईके सर, बाजीराव कन्नाके सर, योगीराज उमरे सर, पद्मा रंगारी मॅडम, शुभांगी खडे मॅडम तसेच शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित राहुन हि प्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण केली.
यावेळी, शाळा सहाय्यक अधिकारी बजरंग वक्टे ,समुदाय समन्वयक राकेश भोपये, राहुल मेश्राम, अश्विनी ढवस यांच्या  सहकार्याने निवडणुक प्रक्रिया पार पडली.
निवडणुक प्रक्रियेनंतर निकाल जाहिर करण्यात आला. निवडुन आलेल्या उमेदवार विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी, अतिशय शांतता ठेऊन तसेच निवडणुक नियमांचे पालन करुन बालपंचायत निवडणूक यशस्वीरीत्या पार पडली. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने