कोरपना:- दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाची आवड अजून दृढ व्हावी व विद्यार्थी पुन्हा नव्या जोमाने घडवा या हेतूने आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
तालुक्यातील धानोली येथील कु शर्वरी यादव किन्नाके हिने या वर्षी झालेल्या दहावीच्या परीक्षेत 86. 80 टक्के गुण मिळवत गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. आज तिचा गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला.
शर्वरी ही यादव किन्नाके आणि सौ. कलिंदा किन्नाके या सर्वसामान्य शेतकरी दामपत्यांची मुलगी असून, अभ्यासाचं उत्तम नियोजन, कठोर मेहनत घेण्याची तयारी, जिद्द, चिकाटी च्या जोरावर हे घवघवीत यश प्राप्त केल. आज शर्वरी चा पेनवासी गोदरु पाटील जुमनाके स्मुर्ती पुरस्कार देऊन गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवतीचे अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, सचिव बापूरावजी मडावी, इको प्रो सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बंडू धोतरे, नागपूर येथील नामांकित डॉ. श्रीनिवास सुरपाम, फिनिक्स सक्सेस अकॅडमी पुणे चे संचालक किरण नैताम, जनसेवा गोंडवाना पार्टीचे प्रदेशाध्यक्ष धीरज शेडमाके, चंद्रपूर चे गोंडराजे वीरेंद्रशहा आत्राम, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेचे अध्यक्ष सुधाकरजी कन्नाके, जिवतीचे माजी सभापती भीमरावजी मेश्राम, माजी सरपंच हनुमंत कुमरे, विजय तोडासे, लिंगोरावजी सोयाम, रमेश कुमरे, ज्योतीरावण गावडे, संजय तोडासे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे उपस्थित होते.
शर्वरीच्या या यशाबद्दल तीच सर्वदूरवर कौतुक आणि अभिनंदन केल जात आहे.