नवीन रेशनकार्ड धारकांना 45 दिवसात धान्य द्या.

नवीन रेशनकार्ड धारकांना 45 दिवसात धान्य द्या.
- संतोष देरकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष यांचा प्रशासनाला गंभीर इशारा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यात नवीन राशनकार्ड धारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे नवीन रेशनकार्ड काढून तीन ते चार वर्षाचा कालावधी लोटून चालला आहे  पुरवठा विभाग अजूनही गंभीर नाही. नवीन रेशनकार्ड धारकांना 45 दिवसात त्या कुटूंबाच्या उत्पनावर आधारित मर्यादा पाहून कोणता लाभार्थी कोणत्या योजनेत मोडतो याची पडताडणी करून धान्य योजनेत समाविष्ट  करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर यांनी या निवेदनातून मागणी केली आहे. 
नवीन रेशनकार्ड धारकांचे रेशनकार्ड काढून तीन चार वर्षे झाली तरी सुद्धा रेशनकार्ड धारकांना रास्त दुकानातून राशन मिळत नाही अशा वेळेस गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य मिळत नसल्याने नागरिकात मोठा असंतोष निर्माण झाला आहे शासन अन्नधान्य पुरवठा योजनेतून करोडो रुपयांची योजना काढतात परंतु ज्या नागरिकांनी नवीन रेशनकार्ड काढले त्यांना आतापर्यंत रेशन दुकानातून राशन मिळत नाही याबाबत काही नागरिकांनी अधिकाऱ्याला विचारले असता त्यांना सांगण्यात आले की तुमचा कोटा अद्याप यायचा आहे पण तीन चार वर्षे ओलांडून जर राजुरा तालुक्यात नागरिकांना राशन मिळत नसेल तर रेशनकार्ड कशाला ? असा संतप्त सवाल नागरिकांच्या वतीने  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष संतोष देरकर यांनी केला आहे 
करीता लवकरात लवकर रेशनकार्ड चालू करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष  संतोष देरकर यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत