Top News

रस्त्यावरील खड्या विरोधात रामपूर येथील महिला आक्रमक #chandrapur


आंदोलन करताच लगेच घेतली दखल; खड्डे बुजवायला झाली सुरुवात
राजुरा:- स्थानिक रामपुर-सास्ती रोड वर अनेक जीवघेणे खड्डे पडले आहेत्. आणि रस्ता दुरुस्तचि कामे अतिशय संत गतीने सुरु आहे. त्यामुळे रोजच अपघाताची मालिका सुरु असून नागरिकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागतं असून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतं आहे. या विरोधात रामपूर येथील महिला आक्रमक झाल्या असुन खड्या वरती रांगोळी व वृक्ष रोपन करुन् निषेध व्यक्त केला. प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला. त्वरित खड्डे भुजवीन्याचे काम न झाल्यास तीव्र आंदोलन करू अशा इशारा लता डकरे यानी दिला. प्रशासन ने धसका घेऊन त्वरित कामाला सुरुवात केली.
या आंदोलन प्रसंगी संगीता विधाते, लता डकरे, जगदीश बुटले, सचिन क्षीरसागर, अजय साकीनला, सूरज गवाने,मून , फुलझेले, तिखे, गजभे, हरिहर,मालेकर,बारशिंगे,गिरटकर,नले,बोबडे,बादल, शरद आदीची उपस्थित होती.
आंदोलना नंतर लगेच केली कामाला सुरुवात

रामपूर वासियांनी रस्त्यावरील मोठया प्रमाणात पडलेल्या खड्ड्याच्या विरोधात आंदोलन करताच कंत्राटदाराणे जेसीबी च्या साह्याने गिट्टी टाकून खड्डे बुजवीन्यास सुरुवात केल्याने रामपूर वासि्यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने