मा. संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम येथील मुलांना शैक्षणिक किटचे वितरण.

Bhairav Diwase
0
मा. संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम येथील मुलांना शैक्षणिक किटचे वितरण.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राजुराचे स्तुत्य उपक्रम.


राजुरा:- दि. 26 आगस्ट 2022 ला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त, अभ्यासू व्यक्तिमत्त्व सन्माननीय संजयजी भोकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे, जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, राजुरा तर्फे अनाथ आश्रम, चुनाळा येथील मुलांना शालेय शैक्षणिक कीट व अल्पोआहार देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.


    यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल थोरात यांनी पत्रकार संघाचे राज्य संघटक मा. संजयजी भोकरे यांच्या कार्यशैलीबद्दल माहिती दिली. तसेच अनेकांनी आपले विचार मांडले.


    त्याप्रसंगी म. रा. मराठी पत्रकार संघ, राजुराचे मार्गदर्शक प्रा. अनंत डोंगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल थोरात, सचिव रत्नाकर पायपरे, कार्याध्यक्ष सतीश शिंदे, सहसचिव संजय रामटेके, कोषाध्यक्ष राकेश कलेगुरवार, प्रसिद्धी प्रमुख अनिलकुमार गिरमिल्ला, सदस्य लोकेश पारखी, कैलास कार्लेकर, अंकुश भोंगळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)