नेफडोचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संतोष देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त बेबी किटचे वाटप.

उपजिल्हा रुग्णालयात नवजात शिशु ना बेबी किट वाटप.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:-सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संतोष देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे नवजात शिशुला बेबी किट चे वाटप करण्यात आले.
     यावेळी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, विजयकुमार जांभूळकर नागपूर विभाग अध्यक्ष नेफडो, रफिक शेख, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , अर्चना ददगाड, शहर अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , सुजित कावळे,  स्वप्निल बाजूजवार, राजू ददगाड,  संतोष मेश्राम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. दरवर्षी संतोष देरकर हे वाढदिवसानिमित्त नवजात शिशु ना बेबी किट वाटप करतात. तसेच वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रम घेतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत