रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोन कामगार गंभीर जखमी #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase

ताडाळी एम आय डीसी रस्त्यावरील घटना
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- आपल्या कामावरून मोटारसायकलने रात्रोच्या वेळेस घरी परत येत असतांना अचानक रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोन कामगार जखमी झाल्याची घटना ताडाळी ते एम आय डी सी रस्त्यावरील गोपीका इंडियन गॅस गोदाम जवळ बुधवारी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेची तक्रार चंद्रपूर वनपरिक्षेत्र कार्यालयात करण्यात आली असून जखमींना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
ताडाळी येथील सतीश बंडू राऊत वय ३२ वर्ष व गणेश संजय क्षिरसागर वय १८ वर्ष हे दोघे आपल्या मोटार सायकलने आपले काम आटोपल्यावर घरी परत येत असताना राडुकरांच्या एक मोठा कळप अचानक समोर आल्याने हे दोघेही दूर फेकल्या गेले या अपघातात संदीप राऊत यांचा डावा हात मोडला तर संजय क्षीरसागर हा किरकोळ जखमी झाला.
या दोघांनाही उपचारासाठी चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर माहिती सूर्यकांत राजुरकर यांनी पत्रकारांना दिली. या रस्त्यावर अनेकदा रानडुकरांचा कळप आडवा येत असल्याने कामगारांना धोका निर्माण झाला आहे.