पोलीस जवानाने आपल्याच सहकाऱ्यावर केला गोळीबार #chandrapur #gadchiroli #firing


गडचिरोली:- एटापल्ली तालुक्यात सकाळच्या सुमारास गस्तीवर असलेल्या शीघ्र कृती दलाच्या पथकातील एका जवानाने सहकाऱ्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली.
ही घटना एटापल्लीपासून जवळच असलेल्या आलदंडी मार्गावर घडली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या जवानाला नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. संतोष सिडाम असे आरोपी जवानाचे नाव असून विजय करमे असे जखमी जवानाचे नाव आहे.
एटापल्ली उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या शीघ्र कृती दलाच्या पथकातील जवान सकाळी गस्तीवर होते. दरम्यान, संतोष आणि विजय या दोन जवानांमध्ये वाद झाला. यातून संतोषने विजयवर थेट गोळीबार केला. यात विजय गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ हेलिकॉप्टरमधून नागपूर येथे नेण्यात आले. सध्या जखमी जवानाची प्रकृती स्थिर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत