Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

पोलिसांनी केले लाखोंचे घबाड जप्त #chandrapur #Gadchiroli

गडचिरोली:- गडचिरोली जिल्हयात अतिसंवेदनशील असलेल्या हेटी परिसरात एका इसमाच्या घरी छापा टाकून पोलीसांनी तब्बल 32 लाख रुपये जप्त केले आहेत. पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली.
माओवाद्याची सतत कारवाई सुरू असलेल्या भागात ही रक्कम आढळल्याने पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे. हेटी येथील साईनाथ कुमरे याच्या घर पोलिसांनी धाड टाकली. त्यांना याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांना एका पोत्यात रक्कम असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी छापा टाकला त्यात पाचशे रुपयापासून 100 ते 200 आणि 50 च्या नोटांचे बंडल सापडले आहेत. ही रक्कम साधारण 32 लाख रुपये आहे. माञ ही रक्कम सट्टापट्टीच्या व्यवसायातून कमावल्याची कबुली संबंधित इसमाने दिली.
हा परिसर माओवादप्रभावीत असल्याने पोलीसांनी ही रक्कम जप्त करुन आयकर विभागाला याची माहीती दिली असून नंतर पुढील चौकशी होणार आहे. पोलीसांनी जप्त करुन रक्कम सील केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत