Top News

शहरातील दादमहाल वॉर्ड परीसरात पथनाट्य च्या माध्यमातून स्वच्छता जनजागृतीचा संदेश #chandrapur


चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर यांच्या सौजन्याने स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत स्वच्छ भारत अभियान माझी वसुंधरा अभियान व सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज हे संपूर्ण अभियान यावर अभिनय सूत्रम एक्टिंग क्लासेस ची टीम शहरांतील दादमहाल वार्ड येथे पथनाट्य च्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर टाळावा,

आपण धरतीला वसुंधरा म्हणतो माता म्हणतो तिला आपणच हानी पोहोचवतो म्हणून झाडे लावा पण त्यांना जगवा असा देखील संदेश दिला त्यानंतर सार्वजनिक परिसर उद्यान हे स्वच्छ ठेवले पाहिजे. अस्वच्छ परिसर असल्याने आपल्या आरोग्यावर किती हानी पोहोचू शकते याची देखील माहिती दिली.
तृप्तेश मासिरकर, राजेश सोयाम्, प्रणाली कवाडे, सपना आवळे, अतुल येरगुडे, तलाश खोब्रागडे आदी द्वारे पथनाट्य सादर करण्यात आले,या पथनाट्य टीम ला प्राची नांदलवार ताईचे सहकार्य लाभले.

प्रत्येक नागरिक हा स्वच्छता प्रती बांधील आहेत,आणि या पथनाट्य जनजागृती च्या माध्यमातून आजूबाजूचा परीसर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल,संपुर्ण पथनाट्य टीम द्वारे उत्तम प्रकारे स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती केल्याबद्दल व उपस्थित परिसरातील नागरिकांचे भाजपायुमो मध्य बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार यांनी आभार व्यक्त केले.
या जनजागृती पथनाट्य क्षणी परिसरातील बाल गोपाल,असंख्य युवा व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लाभली.तसेच हनुमान मंदीर समिती चे सदस्य या क्षणी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने