Top News

शहरातील हनुमान खिडकी येथे तान्हा पोळा सण साजरा* chandrapur




चंद्रपूर:- पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा सण म्हणून साजरा करतात.रंगरंगोटी करून सजविलेले लाकडी बैल, अर्ध्या फुटापासून ते पाच फुटापर्यंतचे डौलदार आकर्षक बैल, यात कुणी बैलासह लावलेला सामाजिक संदेश, सजलेले बैल अन् नटलेले चिमुकले, खाऊची धम्माल, बोजाऱ्याचे समाधान यामुळे मुलांचे कौतुक होत असे,लहान मुलांना बैलाचे महत्व कळावे यासाठी तान्हा पोळा साजरा करण्यात येतो.


लहान मुलांमध्येही बैल या पशुधनाबाबत माहिती होऊन महाराष्ट्रीयन संस्कृती जपण्यात यावे,या भूमिकेतून शहरातील हनुमान मंदिर समिती तर्फे तान्हा पोळा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तान्हा पोळ्यासाठी लहान मुलांसह नागरिकांनी गर्दी केली होती.चिमुकल्यांसह पालकांनी परीसरात प्रभातफेरी मध्ये देखील या तान्हा पोळ्यात उत्साहाने सहभाग नोंदविला.तान्हा पोळ्यात परिसरातील बालकांनी आकर्षक वेशभूषा करून हजेरी लावली,आणि प्रत्येक सहभागी बाल गोपालांना या क्षणी हनुमान मंदिर समिती तर्फे प्रोत्साहन पर भेट शिक्षण उपयोगी भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले.चंदन परसुटकर व सूरज परसुटकर बंधू आणि भजन ग्रुप तर्फे भक्ती पर भजन संध्या चे आयोजन करण्यात आले होते

या क्षणी शैलेश इंगोले, मोहन मंचलवार, गणेश रामगुंडेवार, आशिष अलचावार, प्रमोद पेदुरवार, श्री. मांजरे काका, गणेश मांजरे, प्रमोद बोबाटे, कृष्णा चहारे, विजय चहारे, सुजल नागापूरे, जय निखारे आदी युवा व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने