गणपती बाप्पाच्या आगमनात नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष? #Korpana

Bhairav Diwase

गणेश चतुर्थी पूर्वी शहरांमध्ये एम. ई. सी. बी. व पोलीस प्रशासनातर्फे जय्यत तयारी
कोरपना:- गडचांदुर चे उपविभागीय अधिकारी नायक साहेब, ठाणेदार सत्यजित आमले, महाराष्ट्र राज्य उपकार्यकारी अभियंता इंदुरीकर व पीडब्ल्यूडी नगरपरिषद कर्मचारी व गावातील नागरिक मनोज भोजेकर यांनी मुख्य मार्गानी पायदळ रुट मार्च केला.
गडचांदूर शहरात गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो पण मुख्य रस्ता ते बस स्टॅन्ड पासून जी शोभायात्रा निघतात त्यात इलेक्ट्रिक पोल वरील वायर मध्ये येत असल्याने गणेश मंडळांना मोठी तारांबळ निर्माण होते. याच अनुषंगाने याही वर्षी अशीच परिस्थिती निर्माण न होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी वर्ग कामाला लागल्याचे दिसून येत आहे पण येथील मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सध्या स्थगित आहे.
एका दिवसातच गणरायाचे आगमन होत असताना मात्र नगरपरिषद व पीडब्ल्यूडी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष व कामात विलंब करताना दिसून येत आहेत. काही प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे तातडीने लक्ष देऊन आपले कामे बजावताना दिसून येतात.  ठाणेदार आमले साहेब, अभियंता इंदुरीकर साहेब यांनी विशेष लक्ष देऊन कामाची पडताळणी केली आहे. मधोमध असलेले इलेक्ट्रिक खांब व केबल बाजूला करून गणेश मंडळाला त्रास होणार नाही याची दक्षता घेत आहे. मानिकगड सिमेन्ट कंपनीने विसर्जन घाटा जवळील खड्डे बजवन्यास सुरुवात केली पण पीडब्ल्यूडी व नगरपरिषद याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचे गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी बोलून दाखविली.