सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा #chandrapur


भारताच्या क्रीडा क्षेत्रात मेजर ध्यानचंद यांच खूप मोठं योगदान:- डॉ. प्रमोद काटकर
चंद्रपूर:- दि. २९ ऑगस्टला सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग व्दारा आयोजित मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रिडा दिवस श्री. शांताराम पोटदुखे सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, कला विभाग प्रमुख डॉ. प्रकाश शेंडे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुंवर, डॉ. कुलदीप गोंड उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश शेंडे बोलताना म्हणाले की, मेजर ध्यानचंद सिंग हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांना हॉकीच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून आजही ओळखलं जातं. त्यांनी भारताच्या क्रीडा क्षेत्रात खूप मोठं योगदान दिल आहे.
प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांनी बोलताना म्हणाले की, ध्यानचंद हे आंतरराष्ट्रीय हॉकी विश्वात सर्वश्रेष्ठ ‘सेंटर फॉरवर्ड’ खेळाडू मानले जातात. गोल करण्याची आर्श्चयजनक क्षमता त्यांना लाभली होती व त्यामुळेच हॉकीक्षेत्रातील ‘जादूगर’ (विझर्ड) असे त्यांना गौरवाने संबोधण्यात येते. बॉल त्यांच्या हॉकी स्टिकपासून वेगळाच होत नसल्याने ते बॉलला हॉकी स्टिकला चिकटवून ठेवतात असा आरोप आणि समजही त्यांच्याबाबतील निर्माण झाला होता.
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रमोद काटकर बोलताना म्हणाले की, हॉकी हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. अनेकांना क्रिकेट किंवा राजकारण हा आपला राष्ट्रीय खेळ आहे असा गैरसमज आहे. पण एकेकाळी हॉकीच्या बळावर आपण जागतिक खेळ जगात मानाचं स्थान पटकावलं होतं. त्यासाठी जे अनेक खेळाडू कारणीभूत होते त्यापैकी मेजर ध्यानचंद यांचं नाव शीर्षस्थानी आहे. भारताच्या क्रीडा क्षेत्रात खूप मोठं योगदान दिल आहे. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, त्याला प्रोत्साहन मिळावे, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरूकता निर्माण व्हावी या साठी आज मेजर ध्यानचंद वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. कुलदीप गोंड, तर प्रास्ताविक डॉ. विजय सोमकुंवर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील खेळाडू व विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत