हातचे पीक गेल्याने तरूण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या #suicide

Bhairav Diwase
0

पोंभूर्णा तालुक्यातील सोनापूर येथील घटना
पोंभूर्णा:- तालुक्यात संततधार पावसामुळे सर्वात जास्त फटका शेतीला बसला. अतिवृष्टीमुळे हातचे पीक गेले. बँकेतून कर्ज घेऊन शेती करणाऱ्या सोनापूर येथील तरूण शेतकऱ्यांने हातचे पिक गेल्याने हताश होऊन टोकाचे पाऊल उचलत स्वताच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २९ आगस्टला उघडकीस आली.
ज्ञानेश्वर वामन गौरकार वय ३२ वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे. सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाेंभूर्णा तालुक्यात संततधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. हिरवीगार पिके कुजून गेली.कर्ज काढून उभी केलेली पिक उद्धवस्त झाल्याने व बॅंकेचे थकित कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून साेनापूर येथील तरूण शेतकऱ्यांने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.तो रविवार पासून बेपत्ता होता.तो घरी आला नसल्यामुळे शोधाशोध सुरू होती. सोमवारला त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जाेशी यांचे मार्गदर्शनात पोलिस अंमलदार राजकुमार चौधरी करीत आहे.
त्याच्या पश्चात आई ,वडिल,
पत्नी,मुलगा,मुलगी असा आप्त परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)