हे अजबच...! चोहीकडे पाणीच पाणी असतांना विहिरीतील पाणी गायब झाले? #Chandrapur


काय म्हणतात अभ्यासक?

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. चोहीकडे पाणीच पाणी आहे. कोरडं पडलेल्या विहीरी काठोकाठ भरल्या आहेत. असे असतांना जिल्ह्यातील एका विहीरीतील पाणी मात्र गायब झाले. या अजब प्रकाराने सारेच चक्रावले आहे. या अजब प्रकाराचे विडीओ, फोटो व्हायरल झाले आहेत. ज्या ज्या वर्षी अति प्रमाणात पाऊस होतो त्यावेळी जमिनीतून बुडबुडे येणे, विहीरीतील पाणी गायब होणे, पुन्हा त्याची पाणी पातळी वाढणे अश्या घटना पावसाळ्यात घडत असतात. ही सर्वसामान्य घटना आहे, असे अभ्यासक प्रा. सूरेश चोपणे यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील ब्रम्हपूरी शहरात मालडोंगरी मार्गावर नागेश्वर नगर राहणाऱ्या गजानन राऊत यांचा घरी अजब प्रकार घडला.घरातील अंगणात असलेली विहीर दिनांक 9 आॕगस्टचा रात्रीपर्यंत तूडूंब भरलेली होती,असे ते सांगतात.मात्र 10 आॕगस्टचा पहाटेला विहीरीतील पाण्याची पातळी 20 ते 25 फूट खाली गेली होती.विहीरीत बुडबुडे निघत असल्याचे त्यांना दिसून आले.
तुडूंब भरलेल्या विहीरीची पाणी पातळी खाली गेल्याने कुतूहल व्यक्त केल्या जात आहे.मात्र खालावलेली पाण्याची पातळी पुन्हा वर येवू लागली.काही तासात विहीरीतील पाणी पुर्वरत झाले.
जिल्ह्यातील पुरस्थिती बिकट

वर्धा,वैनगंगा ,अंधारी नदीला मोठ्या प्रमाणात पुर आला आहे.या पुरामुळे अनेक महत्त्वाचे मार्ग ठप्प पडले आहेत.तर नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे.पुराने वेढलेल्या गावांची स्थिती बिकट झालेली आहे.रूग्णांना डोग्याने उपचारासाठी नेले जात आहे.तर पुरामुळे नळ योजना ठप्प पडल्याने शुध्द पाण्यासाठी गावकर्यांची पायपिट सूरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत