Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे राज्यस्तरीय स्पर्धा 2022 यशस्वीरित्या संपन्न #pombhurna

पोंभुर्णा:- दिनांक 8 ऑगस्ट 2022 ला चिंतामणी इंस्टिट्यूशन्स चे आदी संस्थापक स्व. श्री. वसंतरावजी दोंतुलवार यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

निबंध स्पर्धेचा विषय "आत्मनिर्भर भारत" हा होता. स्पर्धेसाठी बाहेरील विद्यापिठातुन सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. जयंतीचे औचित्य साधून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. जयंतीचा कार्यक्रम आभासी तथा वास्तविक माध्यमातून घेण्यात आला होता. बाहेरील विद्यापीठातील स्पर्धक हे आभासी माध्यमातून कार्यक्रमात जुळले होते. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. एस. डी. देव तसेच नेही महाविद्यालय ब्रह्मपुरी येथील मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. धनराज खानोरकर आणि गोंडपिपरी येथील लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ संगीता बांबोडे कार्यक्रमासाठी आभासीरित्या प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आयोजक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. एस. हुंगे हे होते. ग्रंथपाल सतीश पिसे, डॉ. मेघा कुलकर्णी यांनी विनंतीला मान देऊन मंचाची शोभा वाढवली. स्पर्धेचे परीक्षण डॉ. कुलकर्णी, सौ पुनम चंदेल(सिंग) व सौ संगीता बांबोडे यांनी केले. स्पर्धेत कु. वैष्णवी धकाते आनंद निकेतन कॉलेज वरोरा, कु. कल्याणी झोडे शांताबाई भैय्या कॉलेज ब्रह्मपुरी, व कु. कांचन जैस्वाल चिंतामणी बीएड कॉलेज बल्लारपूर यांना प्रोत्साहनपर बक्षीस मिळालेत तर प्रथम पारितोषिक चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स फॉर्म विद्यार्थिनी कु. रोहीणी गुज्जनवार हिला, द्वितीय पारितोषिक चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपिपरी येथील विद्यार्थिनी कु. प्रीती अलोने हिला आणि तृतीय पारितोषिक श्रीमती मनिबेन एम. पी. शाह महिला स्वायत्त महाविद्यालय माटुंगा मुंबई, SNDT वुमन्स यूनिवर्सिटी, मुंबई येथील विद्यार्थिनी कु. माधवी पवार तिला मिळाले.
विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे व स्पर्धेचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. वैशाली मुरकुटे यांनी केले. तसेच संचलन वर्षा शेवटे यांनी केले. डॉ. सुप्रिया वाघमारे व श्री चंद्रकांत वासेकर यांनी विजेते घोषित केले. कु. सरोज यादव हिने आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने