Top News

आजादी का अमृत महोत्सव निमित्त चेक आष्टा येथे रॅलीचे आयोजन #chandrapur #pombhurna

"हर घर तिरंगा, घर घर तिरंगा"चा जयघोष 

पोंभूर्णा:- 'हर घर तिरंगा' मोहिमेल मजबूती देण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहे. भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव प्रत्येक गावात, शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.
भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यासाठी 'आझादी का अमृत महोत्सव' कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत 'हर घर तिरंगा' अभियान सुरू आहे. 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्टपर्यंत सलग तीन दिवस राष्ट्रध्वज फडकवला जाईल.
जनजागृती करण्याकरिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत चेक आष्टा यांच्या संयुक्त विद्यमाने चेक आष्टा येथे रॅली चे आयोजन करण्यात आले. रॅली च्या माध्यमातून गावामध्ये जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी व विद्यार्थीनी रॅलीत सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने