चंद्रपूरमध्ये भरपावसात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यांच्या ‍या विकासासाठी अभूतपूर्व असा निधी खेचुन आणणारे, विकासपुरूष अशी ज्‍यांची ख्‍याती आहे ते सुधीरभाऊ मुनगंटीवार पुन्‍हा एकदा राज्‍याच्‍या मंत्रीपदी निवड झाल्‍याने या जिल्‍हयाच्‍या विकासाला पुन्‍हा एकदा वेग प्राप्‍त होणार आहे. चंद्रपूरचा हा वाघ पुन्‍हा एकदा विकासासाठी सज्‍ज झाला असून यापुढील काळात चंद्रपूर जिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर होणार असून राज्‍यातील प्रमुख विकसित जिल्‍हा म्‍हणून नावारूपास येईल, असे प्रतिपादन माजी महापौर सौ. राखी कंचर्लावार यांनी केले.
आज झालेल्‍या मंत्रीमंडळ विस्‍तारात सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्‍यानंतर भाजपा कार्यकर्त्‍यांनी चंद्रपूरातील गांधी चौकात एकत्र येत जोरदार जल्‍लोष केला. ढोल ताशांच्‍या गजरात फेर धरून, नाचत, आपल्‍या नेत्‍याच्‍या सन्‍मानार्थ घोषणा देत कार्यकर्त्‍यांनी जल्‍लोष केला. फटाख्‍यांची आतिषबाजी करत आनंद व्‍यक्‍त केला व एकमेकांना पेढे भरवत जलोष साजरा केला.
यावेळी भाजपा महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, भाजपा महानगर कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, माजी मनपा सदस्‍य संजय कंचर्लावार, आशाताई आबोजवार, अॅड. सुरेश तालेवार, शितल कुळमेथे, संगीता खांडेकर, सचिन कोतपल्‍लीवार, राजेंद्र खांडेकर, राजू जोशी, रेणुताई घोडेस्‍वार, सुर्या खजांची, राकेश बोमनवार, सुर्यकांत कुचनवार, सय्यद चॉंद, अरविंद कोलनकर, गिरीश उपगन्‍लावारअमित निरंजने आदींची प्रामुख्‍याने उपस्थित होती.
यावेळी माजी नगरसेविका अंजली घोटेकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार तसे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.