Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रशासनाला तत्काळ मदतीचे आदेश #chandrapur


अमराई वार्डातील भुःखलन झालेल्या घराची देवराव भोंगळे यांच्या कडून पाहणी
चंद्रपूर:- घुग्घुस येथील अमराई वार्डातील एक घर शुक्रवार, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक भुस्खलना खाली धसले. गजानन मडावी यांचे राहते घर भुःखलन होऊन खाली कोसळले. त्यामुळे अमराई परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत कळताच भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर, वेकोलिचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी सांगितले. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

याप्रसंगी पोलीस प्रशासनातर्फे दोरी बांधून भुस्खलनग्रस्त घराकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले असून जवळपासचे अनेक घरे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खाली करण्यात आले आहे. अनेक घरातील कुटुंबियांना जि.प.शाळेत हलविल्यात आले आहे. सायंकाळी दरम्यान मडावी कुटुंब घरी असतांना अचानक घराची भिंत कोसळली त्यामुळे ते सर्व घरा बाहेर निघाले आणि काही क्षणात त्यांचे घर शेकडो फूट खड्यात खाली धसले. जवळपास ६० ते ८० फूट खड्डयात खाली घर धसले आहे. सुदैवाने त्यांचे कुटुंब थोडक्यात बचावले.
याठिकाणी वेकोलिच्या जुन्या काळातील अंडर ग्राउंड कोळसा खाणी होत्या. भुयार मार्गाने कोळसा काढण्याचे काम केल्या जात होते. कालांतराने या अंडर ग्राउंड कोळसा खाणी बंद झाल्या. वेकोलिच्या जिओसी कोळसा खाणीच्या जवळच अमराई वार्ड वसलेला आहे. शेकडो नागरिकांची घरे याठिकाणी आहे. त्यामुळेच ही घटना घडली असावी अंदाज वर्तविण्यात येत आहे.
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, विनोद चौधरी, बबलू सातपुते, साजन गोहने, तुलसीदास ढवस, अमोल थेरे, विवेक तिवारी, विनोद जंजरला, धनराज पारखी, हेमराज बोंबले, सुनील राम, कोमल ठाकरे सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत