Click Here...👇👇👇

ज्येष्ठ समाजसेविका किर्ती पांडे यांना "महाराष्ट्र गौरव " पुरस्कार प्रदान #chandrapur#bhadrawati

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील ज्येष्ठ समाजसेविका किर्ती पांडे यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना,ऑल इंडिया ऍंटि करप्शन पार्लियामेंट कमेटी, भारतीय महाक्रांति सेना, क्राईम प्रिवेंशन ऍंटि करप्शन कमेटी आणि कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे येथिल अन्नाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात येथे "महाराष्ट्र गौरव" प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय सन्मान सोहळा-२०२२ या कार्यक्रमात आंगनवाड़ी, बालवाड़ी प्रशिक्षण आणि सुपरवाइजर कोर्स या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्धल जेष्ठ समाजसेविका किर्ती पांडे यांना हा पुरस्कार प्रदान करुन त्यांना गौरवान्वित करण्यात आले. किर्ती पांडे या गेल्या २५ वर्षापासुन समाजसेवेत योगदान देत असुन सद्या कट्टर शिवसैनिक उपजिल्हा समन्वयक पदावर काम करत आहेत.