🌄 💻

💻

पोंभूर्ण्यात वीज पडून एक गंभीर जखमी #pombhurna

दोन महिलांही आले वीजेचा चपेटमध्ये
पोंभूर्णा :- पोंभूर्णा शहरात बुधवारच्या संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. शेतीचे काम करून परत घराकडे जात असताना आठवडी बाजार परिसरात दि. ३ ऑगस्टला ७ वाजताच्या दरम्यान वीज कोसळली यात एक मजूर गंभीर जखमी झाला.वसंत गुरूनूले वय ५५ वर्ष असे जखमी मजूराचे नाव आहे. त्याचेसोबत असलेल्या दोन महिलाही यात जखमी झाले आहेत.रेखा वसंत गुरूनुले व ममता ईप्पलवार असे जखमी महिलांचे नाव आहे. 
पोंभूर्ण्यातील आठवडी बाजार परिसरात बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. शेतावर मंजूरीसाठी गेलेले तीघे घराकडे परत येत असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत वसंत गुरूनूले हा मजूर गंभीर जखमी झाला.तर सोबत असलेली पत्नी रेखा गुरूनुले व सोबत असलेली ममता दिनेश ईप्पलवार हे सुद्धा विजेच्या चपेटमध्ये आले यात तेही जखमी झाले. आजुबाजुचे मंडळी घटनास्थळी धाव घेत जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आले.मात्र वसंत गुरूनूले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले असून त्यांचेवर वैद्यकीय उपचार सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत