Top News

अँड दीपक चटप यांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा #Rajura



राजुरा:- नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ विरूर स्टेशन द्वारा संचालित इंदिरा गांधी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय स्टेशन यांच्या वतीने लंडन येथे उच्च शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारची 45 लाखाची जागतिक प्रतिष्ठेची 'चेव्हनिंग' शिष्यवृत्ती मिळवणारे देशातील पहिले तरुण वकील अँड दिपक यादवराव चटप यांचा आज 4 आगस्ट 2022 ला सत्कार सोहळा व मार्गदर्शन सोहळा पार पडला.
स्पर्धेचे युग आता केवळ गाव जिल्हा, राज्य, देशा पुरतेच मर्यादित राहिले नाही.सातसमुंदर पार आपलं कर्तव्य गाजविण्याची ही वेळ आहे प्रामाणिक परिश्रमाने आपल्या कार्याचा ठसा जगभरात उमटवण्याचा ध्यास आपण घेतला पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांना आता जागतीक स्पर्धे साठी सक्षम व्हा, असे आव्हान ब्रिटिश सरकारचा चेव्हनींग ग्लोबल लीडर अँड दीपक चटप यांनी इंदिरा गांधी कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थी व मान्यवर मार्गदर्शन, सत्कार सोहळ्यात ते बोलताना सांगितलं
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सावित्रीबाई शिकलीच नसती तर महिलांची शाळा उभारली चं नसती सावित्रीबाई मुळे महिलांना शिक्षण मिळाले, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, कोणत्याही विद्यार्थ्याला अपयश आले तर निराश होऊ नये व हार मानू नका यश हे आपल्या जिद्दीवर अवलंबून असते. जीवन संघर्ष हा नेहमीच करावा लागतो असे मोलाचे मार्गदर्शन अँड वामनराव चटप माजी आमदार राजुरा यांनी केले.
प्रमुख पाहुणे राहुल चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक, रमेशराव पायपारे संस्थापक सचिव नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ विरूर स्टेशन, प्रभाकरराव ढवस अध्यक्ष नव जीवन शिक्षण प्रसारक मंडळ विरूर, गुलाबराव ताकसांडे
सहसचिव, प्राचार्य रेणुका कुंभारे कपिल इदे शेतकरी संघटना तालुका प्रमुख राजुरा, उपसरपंच श्रीनिवास ईलंदूला, माजी सरपंच भास्कर सिडाम दयाराम झाडे, चांगदेव बोंडे, उपसरपंच धानोरा घनश्याम दोरखंडे, प्राध्यापिका मनीषा ढवस, वनिता पेरगुवार, वर्षा वडस्कर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल कौरासे तर प्रास्ताविक पर भाषण प्राद्यापक सुनील गौरकार यांनी केले, शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापक रविकुमार देवेकर यांनी मानले.
र्यक्रमाच्या यशस्वितेकरिता खुशाल वांढरे, गजानन ढवस, यशवंत नक्कावार, राकेश ताकसांडे, उमाबाई धोंगडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने