विरूर स्टेशन ग्रामपंचायत तर्फे RO फिल्टर वॉटरचे 20 लिटर पाणी एक महिन्यासाठी फ्री #Rajuraराजुरा:- वाढत्या दूषित पाण्यामुळे होणारे वेग वेगळे आजार होऊ नये म्हणून विरूर स्टेशन ग्रामपंचायत ने नागरिकांचा विचार करून सरपंच भाग्यश्री आत्राम व ग्रामसेवक नैताम व ग्रामपंचायत सदस्य नी RO फिल्टर वॉटरचे 20 लिटर पाणी एक महिन्यासाठी फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे.

या ऑगस्ट महिना पूर्ण पणे RO फिल्टर चे पाणी फ्री मध्ये नागरिकांना देण्यात येणार आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यावरती काही परिणाम होत दिसत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून गावकरी लोकांनी या RO फिल्टरच्या पाण्याचा लाभ नागरिकांनी घेण्यात यावे व आपल्या आरोग्य ची काळजी घेण्यात यावे अशी ग्राम. पंचायत ची नागरिकांना विनंती केली आहे. आणि गावा मध्ये नाल्या मध्ये फवारणी करण्याचे उपक्रम सुरु आहे. विरूर स्टेशन ग्राम पंचायतनी हा सुंदर उपक्रम राबविले आहे. त्या साठी सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांचे गाव वासियानी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत