Top News

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीचा केला गडचांदूर मित्रपरिवाराने सत्कार #chandrapur


कोरपना:- मित्रपरिवारा तर्फे मोहरम निमित्त भव्य रक्तदान शिबीर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गडचांदूर येथे आयोजित करण्यात आला होता.
त्यात कोरपना तालुक्यातील मौजा धानोली येथील विद्यार्थिनी शर्वरी यादव किन्नाके हिचा माजी नगरसेवक सुहेल अली यांच्या हस्ते गडचांदूर मित्रपरिवारातर्फे सत्कार करण्यात आला. शर्वरी गडचांदूर येथील सावित्रीबाई विद्यालयाची विद्यार्थी असून तिने 86.80 टक्के गुण मिळवत विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला.
शर्वरी ही सामान्य शेतकरी कुटुंबातून येते, अभ्यासाची प्रचंड आवड आणि प्रचंड इच्छाशक्ती मुळे तिने हे यश संपादन केल्याचं तिने यावेळी सांगितलं. तिच्या या यशात आई - वडील आणि परिवाराचे मोठं असल्याचही तिने स्पष्ट केल.
या वेळी शर्वरी चे वडील यादवजी किन्नाके आणि गडचांदूर मित्रपरिवाराचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने