Click Here...👇👇👇

सती नदीच्या पुरात आढळला पोलीस शिपायाचा मृतदेह #death #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase


गडचिरोली:- आजार आणि मानसिक तणावातून घरातून निघून गेलेल्या कोरची तालुक्यातील बेळगाव येथील पोलिस शिपायाचा मृतदेह आज सकाळी कुरखेडा तालुक्यातील पुराडा गावानजीकच्या सती नदीच्या पुरात आढळून आला. प्रताप सुंदरसिंह गावळे असे मृत शिपायाचे नाव आहे. गावळे हे अलीटोला या गावचे मूळ रहिवासी होते.
बेळगाव पोलिस मदत केंद्रात कार्यरत असणारे पोलिस शिपाई प्रताप गावळे हे २८ जुलैपासून बेपत्ता होते. याविषयीची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी गाव पोलिस मदत केंद्रात केली होती. ते आजारी आणि मानसिक तणावात होते. कोणाला न सांगता घरातून निघून गेले होते.
आज पुराडा गावानजीकच्या सती नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या का केली? याविषयीचा उलगडा झालेला नाही. पुराडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भूषण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रल्हाद कोडापे या घटनेचा तपास करीत आहेत