चंद्रपूर:- दिनांक 16 व 17 सप्टेंबर 2022 जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपुर येथे सकाळी 09 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत जिल्हास्तरीय जिमनास्टिक ट्रेनिंग कॅम्प आणि सर्टिफाइड कोच व रेफरी/जज कोर्स चे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराला महाराष्ट्र जिमनास्टिक प्रमुख आधारस्तंभ मागील 45 वर्षापासून जिमनास्टिक या क्रीडा प्रकाराला सर्व शहर व ग्रामीण भागात विकास करण्यात अहोरात्र झटणारे ज्येष्ठ विशेषज्ञ मार्गदर्शक आदरणीय मास्टर गुरु श्री महेंद्र जी चेम्बूरकर सर,(महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष - MAGA) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन्मानित, चेंबूर, मुंबई यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचनालाय भारत सरकार, खेलो इंडिया, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया व असोसिएशन ऑफ इंडियन यूनिवर्सिटीज द्वारा मान्यता प्राप्त- जिम्नास्टिक क्रीडा प्रकारच्या चंद्रपुर जिल्ह्यात सर्वत्र विकास व प्रसार कार्य करण्याच्या उद्देशाने या कॅम्पचे आयोजन महाराष्ट्र अमेचुर जिमनास्टिक असोसिएशन शी संलग्न चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुर जिम्नास्टिक असोसिएशन द्वारा व जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय चंद्रपुर द्वारा करण्यात आले आहे.
तेव्हा सर्व शाळा, महाविद्यालय, शारीरिक शिक्षक यांनी या कॅम्प करीता आपल्या विद्यार्थ्यांना मुला-मुलींचा संघ सहभागी करावे. आपल्या संघाची संख्या व यादी मोबाइल 9067758618 यावर पाठवावी. असे आयोजन समितीचे अध्यक्ष आशुतोष गयनेवार, चेयरमैन निलेश गुंडावर, उपाध्यक्ष ऍड राजरत्न पथाडे, उपाध्यक्ष वाल्मीक खोब्रागडे, उपाध्यक्ष प्रा. दुष्यंत नगराले, संस्थापक व सेक्रेटरी दुर्गराज एन रामटेके यांनी केली.
अधिक सविस्तर माहीती करीता खालील मोबाइल नंबर वर संपर्क साधावा. 9067758618 9763622708, 9422838280
आयोजन सदस्य सौ अल्का मोटघरे, प्रो. संगीता बाम्बोडे, निकीता ढोरके, बंडू रामटेके, बंडू कर्मनकर, विजय मराठे, राजु साखरकर, अरविंद बनकर, प्रो जी एम एस अली, प्रो डॉ. विजय सोमकुंवर, प्रो डॉ. संघपाल नारनवरे, प्रो तानाजी बायस्कर, के सत्यम, पलक शर्मा, आचल हिवरकर आणि जिम्नास्टिक परिवार चंद्रपुर जिल्हा शाखा यांनी आव्हान केले आहे.