Click Here...👇👇👇

पिपरी (दे.) ग्रामपंचायतीच्या नविन इमारतीचे माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते लोकार्पण #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्‍यातील पिपरी (देशपांडे) येथे जनसुविधा निधी २०१९-२० अंतर्गत बांधण्यात आलेल्या नविन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी संवर्ग विकास अधिकारी महेश वळवी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
तसेच माजी पं. स. उपसभापती विनोद देशमुख, तालुका महामंत्री ओमदेव पाल, सरपंच चंद्रशेखर व्याहाडकर, पो. पा. ओमदास पाल, उपसरपंच कालिदास मोटघरे, जुनगावचे उपसरपंच राहुल पाल, वैभव पिंपळशेडे, विश्वेश्वर भाकरे, सौ. जिवनकलाताई व्याहाडकर, अमित पाल, शंकर वाकुडकर, जितू चुदरी, प्रभाकर पिंपळशेंडे, हेमेंद्र देवाडकर, हिराजी कोहपरे, आकाश वडपल्लीवर, तंमुस.अ. बंडू वासेकर, गंगाधर आरेकर, ग्रा. पं. सदस्य अमित तेलसे, सौ. प्रेमिलाताई पाल, सौ. अनीताताई झाडे, सौ. गिताताई कोहपरे, सौ. वैशालीताई व्याहाडकर यांचेसह मोठ्या संख्येने ग्रामस्थबंधू तथा माताभगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, या क्षेत्रातील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मागील कार्यकाळात आपले मताशिर्वाद मला दिले, त्यामुळेच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून लोकनेते ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यासह या भागात मोठ्या प्रमाणावर विकासात्मक कामे करता आली. आपल्या पिपरीत सुद्धा मुलभूत सोईसुविधांसाठी आम्ही नेहमी आग्रही होतो. गावातील रस्ते, हायमास्ट लाईट, व्यायामशाळा साहित्य, अंगणवाडी असे विविध विकासकामे याठिकाणी पूर्ण करता आली. लोकनेते ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून या क्षेत्राचा अभूतपूर्व कायापालट झालाच यापुढे सुद्धा ही विकासमालिका सुरूच राहणार आहे.
पुढे बोलताना, आयोजकांनी गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली त्यासाठी ग्रामपंचायतीने जलजीवन मिशनमध्ये प्रस्ताव पाठवावा आम्ही तातडीने मागणीच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सुजित येरोजवार यांनी तर आभार प्रदर्शन संगणक परीचालक यांनी केले.