Click Here...👇👇👇

खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने दोन ट्रेन धावणार #chandrapur

Bhairav Diwase

चांदा फोर्ट - गोंदिया मार्गावरील लाखो प्रवाशांना दिलासा
चंद्रपूर:- कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले होते. याकाळात मोठ्या प्रमाणात ट्रेन बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आता परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर देखील ट्रेन सुरु झाल्या नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. हि जनतेची निकड लक्षात घेऊन खासदार बाळू धानोरकर यांनी रेल्वे विभागाशी पाठपुरावा करून ट्रेन क्र. ०८८०८ वडसा - चांदा फोर्ट व ट्रेन क्र. ०८८०५ चांदा फोर्ट - गोंदिया १२ डब्याची मेमू पॅसेंजर स्पेशल ट्रेन सुरु केली. हि ट्रेन प्रवाशांच्या सेवेत १ ऑक्टोबर 2022 पासून पुन्हा एकदा धावणार आहे. त्यामुळे या मार्गावरील जाणाऱ्या लाखो प्रवाशांमध्ये आनंद दिसून येत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती व व्यवसाय करण्यात येतो. चंद्रपूर जिल्ह्यातील धान भागातील शेतकऱ्यांकरिता व गोंदिया जिल्ह्यात व्यवसाय करणाऱ्यांना सोईचे होण्याकरिता चांदा फोर्ट - गोंदिया हि ट्रेन सुरु करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशी देखील ये - जा करीत असत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावरील ट्रेनचे फेरे देखील वाढविण्यात आले होते.
एसटी बस पेक्षा कमी भाडे पडत असल्याने नागरिक देखील या ट्रेनला पसंती देत होते. परंतु कोरोना काळात मोठ्या प्रमाणात जगावर संकट कोसळले. त्यामुळे या ट्रेन देखील बंद करण्यात आल्या होत्या. हि बाब खासदार बाळू धानोरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्वतः लक्ष घालत पाठपुरावा सुरु केला. त्याची दखल घेत या दोन ट्रेन सुरु झाल्या.
जिल्ह्याच्या लहाना पासून तर मोठ्या समस्यांचा पाठपुरावा करून त्या तडीस नेण्याचे काम खासदार बाळू धानोरकर करीत आहे. या मोठ्या प्रयत्नाला यश आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. त्यासोबतच या यशाबद्दल मंडळ रेल उपभोकता सलाहकार समिती सदस्य राजवीर यादव यांनी खासदार बाळू धानोरकर यांचे आभार मानले आहे.