संतनगरीच्या मार्गात जिवघेणे खड्डे.... #Chandrapur

Bhairav Diwase
0

गोंडपिपरी-धाबा-पोडसा राज्यमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे

गोंडपिपरी-पोडसा रस्त्याच्या दर्जाहीन कामाबाबत भाजयुमोचे तहसिलदारा मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन
गोंडपिपरी:- गोंडपिपरी-धाबा-पोडसा या NOT हायब्रीड अंतर्गत राज्य मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. आज घडीला 2 वर्षाचा कालावधी सदर कामाला झाला तरी सुद्धा काम अर्धवटच आहे.
2021 मध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला आणि काम सुरू झाले. आतापर्यंत झालेले काम अतिशय दर्जाहीन असल्याचे दिसत आहे, कारण जवळपास 30 किलोपर्यंत रस्ता या 2 वर्षात संबंधीत कंत्राटदारानी केला. तो रस्ता उखडून गेल्याने परिसरातील नागरिकांनी कामाबद्दल संताप व्यक्त केला. राज्य मार्ग म्हणून मंजूर रस्त्याच्या कामाची आताच दुर्दशा झाली आहे. कामाला गती नाही, या रस्त्यामुळे बसेस नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणनापासून वंचित राहावे लागत आहे, रुग्णाना तालुक्या पर्यंत पोहचण्यासाठी नाहक त्रास होत आहे.
रस्त्या संबंधी मागील 6 महिन्याआधी बांधकाम विभागाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले, मात्र निवेदनावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
अनेक अडचणी या रस्त्याच्या कामामुळे परिसरात निर्माण होत आहे. अतिशय महत्वाचा समजणाऱ्या राज्य मार्गाची दयनीय अवस्था असल्याने भारतीय जनता युवा मोर्चा धाबा च्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. रस्त्याच्या कामाबाबत योग्य ती चौकशी व कामाला गती आणि येत्या 10 दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे यावेळी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)