बांबू पासून बनवलेली श्री. गणेश मूर्ती पंतप्रधानांना भेट #chandrapur

शहरातील ऑऊडाज इंजिनियर्स येथील कारागीर यांनी तयार केलेली श्री गणेशाची मूर्ती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व आमदार श्री. बावनकुळे यांना अतिशय आवडली,व त्यांनी आदरनीय देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांना सप्रेम भेट दिली. माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र जी मोदी यांना मूर्ती खूप आवडली.
लोकलेखा समितीचे अध्यक्ष बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आ. मा. श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार.मंत्री वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांनी देखील बांबूपासून बनवलेली श्री गणेशाची मूर्ती खूप आवडली असून त्यांनी चंद्रपूरात बांबु पासुन निर्माण झालेली गणेश जी ची मूर्ती ही देशपातळीवर चंद्रपूर चा मान उंचावणारी आहेत अशी प्रशंसा करण्यात आली.
ऑऊडाज इंजिनियर्स अंतर्गत बागला चौक, चंद्रपूर, येथे लघुउद्योग कार्यरत असून संचालक अजिंक्य शास्त्रकार आणि आदित्य मसादे हे आहेत. या ठिकाणी बांबू प्रोडक्स मनुफॅक्चरिंग आणि बांबू प्रशिक्षण दिले जाते, तसेच या ठिकाणी 3D प्रिंटिंग, प्रॉडक्ट डिझाईन, मॉडल मेकिंग हे सुद्धा येथे केले जाते. येथे बांबूपासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंना भरपूर मागणी आहे. विशेषतः बांबूपासून तयार होणाऱ्या भेटवस्तू हा सगळ्यांचा आकर्षणाचा विषय आहे. येथे तयार होणाऱ्या वस्तूंची वेगवेगळ्या शहरात खूप मागणी आहे.
ऑऊडाज इंजिनियर्सने आपल्या चंद्रपूर जवळील जुनोना व इतर भागा मधील आदिवासी बांधव यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यातल्या कुशल बौद्धिक व्यक्तिमत्वाला चालना देत त्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला दिलेला आहे याच कुशलतेतून पर्यावरण अनुकूल शाश्वत साहित्याचा वापर व वैशिष्ट्यपूर्ण रचना करून दैंनदिन आयुष्यात वापर करण्याजोगे साहित्य निर्माण करून समाजाला आदर्श ठरत आहेत.या मागे व्यवसाय सोबतच ग्रामीण भागातील जनतेचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे व परंपरेने चालत आलेला व्यवसाय, हस्तकौशल्याला विशिष्ट ओळख मिळावी. स्थानिकांचा रोजगार देऊन त्यांचा आर्थिक विकास करून समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या हेतूने वस्तू निर्माण व विक्री सुरू आहे. इमारतीत तापमान नियंत्रित राहुन वातावरण अल्हाददायक राहील या पद्धतीने देखील काही वस्तू निर्माण करण्याचा या युवा उद्योजकांचा प्रयत्न सुरू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत