नांदगाव मा. मा. तलावाचा मत्स्य पालण परवाना रद्द #chandrapur mul


परवाना नसतांनाही भर उन्हाळ्यात सोडले पाणी

तुडुंब फोडून तलावाची केली होती नुकसान
चंद्रपूर:- जिल्ह्यातील मुल तालुक्यातील नांदगाव मा.मा.तलाव मत्स्य पालण करण्याकरिता बोली बोलून संदीप प्रकाश शिंदे यांना तिन वर्षाकरिता शासनाच्या अटी शर्ती वर लिज देण्यात आली होती. मात्र लिज धारकांनी शासनाच्या अटी शर्ती भंग करुन भर उन्हाळ्यात तलावाचे पाणी सोडल्या मुळे व तुडुंब फोडल्याने तलावाचे मोठे नुकसान करीत गावात पाण्याच्या टंचाई ला नागरिकांना सामोरे जावे लागले.
त्यामुळे येथील शिवाजी अर्जुनकर व इतर गावकऱ्यांनी तक्रार केली होती. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद सिंचन उपविभाग मुल यांच्या चौकशी अहवालावरून लिज धारक संदीप प्रकाश शिंदे यांचा परवाना रद्द केला आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या नांदगाव येथील मा.मा. तलाव पंचायत समिती मुल कडून दरवर्षी लिज देण्यात येते. सदर तलाव सन २०१९-२०२० या वित्तीय वर्षात लिलावात बोली लाऊन संदीप प्रकाश शिंदे यांना तिन वर्षाकरिता ठेक्याने देण्यात आला होता.
संपूर्ण वित्तीय वर्षाची रक्कम भरणा केल्याने त्यांना ठेका कालावधी संपल्याने पुढील एक वर्षाकरिता निशुल्क मदतवाढ निर्देश असल्याने त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या वर्षी संदीप प्रकाश शिंदे यांनी भर उन्हाळ्यात कुठलीही पुर्व परवानगी न घेता तलावाचे संपूर्ण पाणी सोडून मत्स्यव्यवसाय केला. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्या अनुषंगाने शिवाजी अर्जुनकर व इतर गावकऱ्यांनी तक्रार केल्याने संबंधित प्रशासन या बाबींची गंभीर दखल घेत चौकशी केली.
चौकशीत लिजधारकांनी तलावाचे पाणी सोडून तलावाचे तुडुंब ही तोडल्याचे प्रत्यक्ष निष्पन्न झाले. त्यामुळे तलाव ठेका करारनामा मधील अट क्रमांक २ व अट क्रमांक १० चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लिजधारक संदीप प्रकाश शिंदे यांना ठेका देण्यात आलेला मा.मा तलाव ठेका उर्वरित कालावधी करिता रद्द करण्यात आला आहे. व पुढील कालावधी करिता त्यांना अपात्र करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत