Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

सरदार पटेल महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन #blooddonation #chandrapur


चंद्रपूरभूषण स्व. शांताराम पोटदुखे यांच पुण्यस्मरण कार्यक्रम
चंद्रपुर:- सरदार पटेल महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की शुक्रवार दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वा. स्वर्गीय श्री शांताराम जी पोटदुखे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य रक्तदान शिबिरात ज्या विद्यार्थ्यांना स्वेच्छाने रक्तदान करायचे आहे त्यांनी आपली नावे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विजय ई. सोमकुवर आणि डॉ. कुलदीप आर गोंड यांच्याकडे लवकरात लवकर द्यावे तसेच रक्तदान शिबिराला वेळेवर उपस्थित राहावे.
चंद्रपूरभूषण स्व. शांताराम पोटदुखे यांच पुण्यस्मरण कार्यक्रम

चंद्रपूर येथील सर्वोदय शिक्षण मंडळाचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आदरांजली कार्यक्रमानिमित्त मान्यवरांचा सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संपादक श्रीपाद अपराजित वं विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, तर अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधा पोटदुखे उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम येथील सरदार पटेल महाविद्यालयात होणार असून, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वोदय शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व मंडळाद्वारे संचालित विविध शाळा, महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत