कॅबिनेट मंत्री मुनगंटीवार यांच्यातर्फे राज ठाकरे यांना तिरंगा ध्वज भेट #chandrapur

चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टीच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संवाद साधत कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण अंश ध्वनीक्षेपीत करणारा तिरंगा ध्वज भेट स्वरूप प्रदान केला.
शिष्टमंडळात भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री सुभाष कासमगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे,प्रकाश धारणे,माजी महापौर राखी कंचर्लावार राहुल पावडे, विशाल निंबाळकर यांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत