Top News

पर्यावरण संवर्धन व मानवता विकास हे सर्जनशील व पवित्र कार्य:- अमोल गर्कल #Rajura


न. प. शाळेतील मुलींना लाकडी फोल्डिंग स्टडी टेबल वितरण

पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

नेफडो सदस्यांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्या वाढदिवसानिमित्य नगर परिषद शाळेतील मुलींना लाकडी फोल्डिंग स्टडी टेबल वितरण, स्नेहमिलन सोहळा व नेफडो द्वारे आयोजित पर्यावरण पूरक घरगुती व सार्वजनिक गणेश सजावट स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच सामाजिक वनीकरण विभाग द्वारा आयोजित चीत्ता या वन्य प्राण्यांचे चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमोल गर्कल, उपविभागीय वनाधिकारी राजुरा हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश ऐलकेवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग राजुरा, शोभा उपलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनिकरण, कार्यालय राजुरा, विजयकुमार जांभुळकर, प्रशासकीय अधिकारी,न.प. राजुरा, संकेत नंदवंशी, अभियंता पाणीपुरवठा विभाग न.प. राजुरा, आदित्य खापणे, अभियंता, विद्युत विभाग न. प. राजुरा, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वृक्षाचे पूजन व वृक्ष प्रतिज्ञा मोहनदास मेश्राम यांच्या हस्ते घेण्यात आली. उपस्थितांना वृक्ष व कुंडी भेट देण्यात आली. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद शाळेतील मुलींना लाकडी फोल्डिंग स्टडी टेबल वितरित करण्यात आले. पर्यावरण पूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नारायणप्रसाद झंवर, द्वितीय क्रमांक संतोष संगमवार, तृतीय क्रमांक सानवी सचिन मोरे, प्रोत्साहनपर भार्गव संजय चिडे व विशेष प्रोत्साहनपर पुरस्कार प्रियांशु मनीष मंगरूळकर यांना प्रदान करण्यात आला.
तसेच पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धेमधे प्रथम क्रमांक श्री लोकमान्य गणेश मंडळ, द्वितीय क्रमांक ॲड. यादवराव धोटे कॉलेज गणेश मंडळ, तृतीय क्रमांक विदर्भ गणेश मंडळ यांनी प्राप्त केला. यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्हाचे सौजन्य प्रेरित दिलीप सदावर्ते, सचिन मधुकरराव मोरे, जयश्री शशांक धोटे हे होते. सामाजिक वनीकरण विभाग द्वारे चित्ता या वन्य प्राण्याचे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अनुक्रमे पहिल्या गटातून वर्ग पहिली ते सातवी मधून शिवम नागेश्वर भोंगळे, प्रियल प्रशांत वाघे, श्रीवर्धन प्रमोद पिपरे, दुसऱ्या गटामधून वर्ग आठवी ते दहावी मधून आकांक्षा अनिल कोंडेकर, स्नेहा विजय तलांडे, कस्तुरी रवींद्र बेले यांनी क्रमांक प्राप्त केला. विजेत्यांना सामाजिक वनीकरण विभागाद्वारे बर्ड फिडर व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच नेफडो संस्थेच्या वतीने यावेळी स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये संस्थेतील सभासदांनी नृत्य, गीत गायन सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रपूर जिल्हा महिला सचिव सुनैना तांबेकर यांनी केले तर पर्यावरण पूरक गणेश सजावट बक्षीस वितरण चे सूत्रसंचालन चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष आशिष करमकर यांनी केले. प्रास्ताविक नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर यांनी तर आभार चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संतोष देरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समितीच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा रजनी शर्मा यांच्या मार्गदर्शनात मनोज तेलीवार, बबलू चव्हाण, आकाश वाटेकर, वज्रमाला बतकमवार, सर्वानंद वाघमारे, विलास कुंदोजवार, कृतिका सोनटक्के, कविता शर्मा, चंद्रकला मालेकर आदींसह नेफडो च्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
----------------------------------------------
अमोल गर्कल, उप विभागीय वनअधिकारी
पर्यावरण संवर्धन व मानवता विकास हे अतिशय सर्जनशील व पवित्र कार्य असून या कार्यामध्ये नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सर्व सभासदांनी स्वतःला झोकून दिले आहे. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्या मार्गदर्शना मध्ये पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे विविध कार्य करून अल्पावधीतच या संस्थेने नावलौकिक प्राप्त केले आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाना,गरजूना मदत करणे आणी पर्यावरणपूरक बाबींवरचे जनजागरण करणे, कृतीयुक्त कार्यक्रम राबविणे नक्कीच कौतुकास्पद आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने