Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

नगरसेवकांनी जनतेला घेऊन पोंभूर्णा नगरपंचयातवर केला हल्लाबोल #pombhurnaशेकडो जनतेचा नगरपंचयातच्या भोगळ कारभारा विरोधात आक्रोश
पोंभूर्णा:- नगरपंचायतच्या मनमानी व भोंगळ कारभाराला कंटाळलेल्या नगरसेवकांनी शेकडो नागरिकांना सोबत घेऊ नगरपंचायत कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले.यामध्ये प्रमूख मागण्या पोंभुर्णा शहरातील नागरिकांना प्रधानमंत्रीव रमाई घरकुल योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा,शहरातील दूषित पाणीपुरवठा बंद करुन शुद्ध व नियमित पुरवठा करण्यात यावा.
पोंभूर्णा नगर पंचायत येथील विविध योजनेतील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,जनतेच्या कामात कसूर करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, नगरपंचायतच्या विकासात्मक कामकाजावर व प्रशासनावर वचक नसणाऱ्या नगराध्यक्षा-उपाध्यक्ष यांनी त्वरित राजीनामा देऊन पदमुक्त व्हावे, शहरातील सि.सी.टिव्ही. कॅमेरा बंद अवस्थेत असून या योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याने त्याची योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१-२०२२ प्रशासकीय खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
वैयक्तिक शौचालय बांधकाम योजनेची निधी लवकरात लवकर अदा करण्यात यावी,अपंग बांधवांना न.पं.कडून देण्यात येणारा ५ टक्के निधी लवकरात लवकर वाटप करण्यात यावा.व आदी विविध मागण्यांना घेऊन गटनेता आशिष कावटवार,नगरसेवक अतुल वाकडे,गणेश वासलवार,अभिषेक बद्दलवार,नगरसेवक,बालाजी मेश्राम,नंदकिशोर बुरांडे,नगरसेविका रामेश्वरी वासलवार,रिनाताई उराडे,यांच्या नेतृत्त्वात व बल्लारपुर नगरपालिकेचे माजी उपनगराध्य सिक्की उर्फ विनोद यादव यांच्या प्रमूख उपस्थीत नगरपंचायत कार्यालयावर भव्य हल्लाबोल आंदोलन करण्यात आला.
शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अंदोलन स्थळी येउन मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी मागण्याचे निवेदन स्विकारत सात दिवसाच्या आत मागण्यापूर्ण करण्याचा आश्वासन आंदोलकांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत