घरात खेळणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
परीसरात दहशतीचे वातावरण
भद्रावती:- भद्रावती लगतच्या आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर - ४ मध्ये घरात खेळणा-या चार वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात प्राची पंढरी नन्नावरे ही चिमुकली किरकोळ जखमी झाली.ताडोबा लगतच्या आयुध निर्माणी वसाहत परिसरातील जंगलात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. येथील हिंस्त्र वन्यप्राणी आता घराच्या दारावर पोहोचून हल्ला करीत असल्याने वसाहतीत दहशतीचे वातावरण आहे.
या वसाहतीत यापूर्वी वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे तर काही जखमी झाले आहेत. परिसरात वाघाच्या मृत्यूच्या घटनाही समोर आल्या आहेत. मंगळवारी आयुध निर्माणीच्या सेक्टर – ४ मधील सदनिका क्रमांक ४२ बी मध्ये प्राची सायंकाळच्या सुमारास खेळत होती. दरम्यान, बिबट्याने घरात शिरून तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुदैवाने ती वाचली, परंतु तिच्या पायाला जखम झाली असून प्राथमिक उपचारानंतर ती घरी परतली.