पोंभुर्णाच्या वतीने पोलीस बांधवाना हेल्मेट वाटप

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने "सेवा पंधरावाडा" कार्यक्रम अंतर्गत भाजपा तालुका पोंभुर्णाच्या वतीने पोलीस बांधवाना हेल्मेट वाटप करण्यात आली जेणेकरून ते लोकांचे संरक्षण करताना स्वतःचे पण रक्षण करू शकतील आणि नेहमीच पोलीस लोकांची सुरक्षितता करतील. 
यावेळी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी, अजित मंगळगिरिवार उपाध्यक्ष, ईश्वर नैताम महामंत्री, हरीश ढवस महामंत्री,  ऋषी कोटरंगे अध्यक्ष शहर, गजानन मुडपूवार,विनोद देशमुख माजी पचायत समिती उपसभापती , अजय मस्के युवा अध्यक्ष,दर्शन गोरन्टीवर नगरसेवक, संजय कोडापे नगरसेवक, श्वेता वनकर नगरसेवीका नंदाताई कोटरंगे सभापती न.पं.पोंभुर्णा , आकाशी गेडाम सभापती न.पं.पोंभुर्णा , मोहन चलाख सेवा पंधरावाडा प्रमुख, बंडू बुरांडे सरपच,रोशन ठेंगणे उपसरपच, राजू ठाकरे ठाणेदार जोशी साहेब आणि सर्व पोलीस कर्मचारी अनेक कार्यर्ते उपस्थित होते.