Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

आमचे अन्नधान्य गोर-गरिबांना द्या #chandrapur #pombhurna


पोंभुर्णातील "त्या" नागरिकांनी प्राधान्य योजनेतून पडले बाहेर
पोंभुर्णा:- अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रेशनवर धान्य दिले जाते. मात्र अनेक वेळा गरज नसतांनाही लाभार्थी धान्य उचलतात. त्यामुळे ज्यांना धान्याची गरज असते अशा लाभार्थ्यांना वंचित रहावे लागते. त्यामुळे ज्यांना धान्याची गरज नाही अशा लाभार्थ्यांनी अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन अन्नधान्य पुरवठा विभागाने केले होते. या आवाहनानंतर पोंभुर्णातील नागरिक मारोती शंभर भंडारे यांनी स्वमर्जीने प्राधान्य कुटंब योजनेतून बाहेर पडले आहेत.
या संदर्भातील अर्ज त्यांनी येथील तहसीलदार शुभांगी कनवाडे , पुरवठा निरिक्षक मेश्राम याच्याकडे सुप्रुद केला. व माझ्या सारख्या अन्य नागरिकांनी सुद्धा गरिबांना धान्य मिळावे म्हणून स्वेच्छेने अन्नधान्य योजनेतून बाहेर पडावे असे आवाहन केले. त्यांच्या या उदारमतवादी निश्चयाचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.
....तर योजना सोडावी

ज्या नागरिकांना स्वस्त धान्य नको आहे. अशा नागरिकांनी पुरवठा विभाग किंवा राशन दुकानदार यांच्या कडे अर्ज भरुन राशन नाकारता येते. त्यामुळे समाजातील गरीब व गरजू नागरिकांना हे धान्य देता येणार. ज्या लाभार्थ्यांना धान्याची गरज नाही त्या लाभार्थ्यांनी धान्य नाकारले पाहिजे.
काय आहे 'गिव्ह इट अप' उपक्रम

अन्नसुरक्षा योजनेतून २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ मिळतो. या योजनेतील लाभार्थ्यांना स्वेच्छेने हे धान्य नाकारता येते. नाकारलेल्या धान्याचा गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. त्याबाबत रेशन सोडण्याचा अर्ज रेशन दुकानदार यांना द्यावा लागतो. त्यानंतर प्रशासन दुसऱ्या लाभार्थ्यांची निवड करुन देईल अशी संकल्पना आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत