Top News

सकाळचे 11 वाजून गेले तरीही नगर परिषदेत कर्मचारी, अधिकारी हजर नाही #Korpana #Gadchandurकोरपना:- औद्योगिक शहर व सिल्वर सिटी म्हणून देशात ओळख निर्माण असलेल्या व नगर परिषदेला रामभरोसे करणारे कर्मचारी यांनी ही नवीन ओळख निर्माण केलेली. ही नगर परिषद दुसरी कोणतीही नसून गडचांदूरची नगर परिषद आहे. या नगर परिषदेला कोणीही वाली नाही. त्यामुळे येथील कर्मचारी हेच अधिकारी बनलेले आहे. कोणतेही कर्मचारी हे वेळेवर येत नाही किंवा कोणी साधारण नागरिक काम घेऊन गेल्यास त्याचे काम तात्काळ होत नाही.
 दिनांक 15/11/2022 ला नगरपरिषद गडचांदूर ला सकाळी 10 वाजता भेट दिली असता नगर परिषद येथे बोटावर मोजणे इतकेच कर्मचारी उपस्थित होते व इतर कर्मचारी हे एक तास लोटूनही 11 वाजेपर्यंत आले नव्हते. एखाद्या दिव्यांग बांधवाला नगर परिषद ला काम असल्यामुळे तो नगर परिषदेला गेला असता त्या दिव्यांग बांधवाला एक तास तात्काळ उभे राहावे लागले यावरून लक्षात येते की हे कर्मचारी मुजरपणा करून रोजच अशे उशिरा येतात यामुळे त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही किंवा कोणत्याही अधिकाऱ्याचे नियंत्रण नाही, कोणीही कार्यवाही करत नाही नागरिकांना रोज या नगरपरिषद ला कोणत्याही काम निमित्त यावे लागते कोणताही कर्मचारी त्यांना सविस्तर माहिती देत नाही हे आज अनुभवले एक साठ सत्तर वर्षाची वृद्ध महिला नगर परिषदेला काम घेऊन आली असता तिला सुद्धा कोणीही कर्माचारी काहीही सांगत नव्हते व तिला तत्काळत उभे राहावे लागले.
नगर परिषदेला आलेले प्रहारचे सतीश बिडकर यांनी त्या महिलेची विचारपूस केली असता त्या महीलेनी घरकुल यादीमध्ये नाव आले असता ते नगर परिषदेने रद्द केले असे त्या महिलेचे म्हणणे होते व एकाच घराला दोन-दोन घर टॅक्स पावती येत होत्या हे कारण घेऊन ती नगरपरिषदेत आली असता एकच घर दोघांच्या नावाने आणि दोघांनाही तेवढ्याच घर टॅक्स येत होते. नेमकं नगर परिषद मध्ये काय चाललं हे त्यांना ठाऊक नाही नगर परिषदेला विचारले असता त्यांनी उडवा उडविची उत्तरे दिली. या मागचा नेमका कारण काय? हे समजलेच नाही मग या कर्मचाऱ्यानवर कुणाचेच नियंत्रण नाहीं का? मुख्याधिकारी यांना या बाबत माहितीसाठी फोन केला असता त्यांनी फोन उचला नाही. या आधी सुद्धा मुख्याधिकारी यांना फोन केला असता त्यांनी फोन उचालाच नाही. मग सामान्य नागरिकांनी कुणाला समस्या सांगायची असा समज आता नागरिकांन मध्ये येत आहे.
मी काही काम निमित्त नगर परिषदेला आलो असता तिथे तीन-चार कर्मचारी उपस्थित होते व बाकीचे कर्मचारी हे ११ वाजेपर्यंत सुद्धा यायचे होते. व मला ज्या कर्मचाऱ्यांकडे काम होते. त्या कामासाठी मला एक तास ताटकळत राहावे लागले.
पंकज मनुसमारे दिव्यांग बांधव
नगर परिषद ही रामभरोसे आहे. तिथे त्यांच्यावर कोणत्याच अधिकाऱ्याचे नियंत्रण नाही. असेस सुरू राहिल्यास नागरिकांना मानसिक, शरारिक, व आर्थिक त्रास सहन करावा लागेल, या नंतर आम्ही कधीही नगर परिषदेला जाऊ व कर्मचारी उपस्थित नसेल तर तिथेच आंदोलनाला बसू.
सतिश बिडकर
कोरपना तालुका अध्यक्ष
प्रहार जनशक्ती पक्ष

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने