Top News

जि. प. उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा येथे संविधान दिन साजरा #chandrapur #pombhurna


संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा शाळेत संपन्न


पोंभुर्णा:- दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेकआष्टा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून सौ. कांताताई मडावी यांनी स्थान भूषवले. तर उद्घाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष बोंडे हे होते. याप्रसंगगी जगन्नाथ येलके, उपसरपंच चेकआष्टा, मनोज मुडावार सर, ग्रामसेवक चेकआष्टा, सविता लाकडे मॅडम, प्रभाकर मरस्कोल्हे, सुरज मडपती, तुळशीदास गेडाम, ज्येष्ठ नागरिक हनुमंत कुंभरे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते.
बल्लारपूर रेल्वे स्टेशनचा उडानपुल कोसळला


कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावामधुन संविधान रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये 'अरे डरने की क्या बात है, संविधान हमारी साथ है' ' तुमचा आमचा एकच विचार, संविधानाचा करू प्रचार', 'भारताचा अभिमान, सविधान! सविधान!,' 'ना एक धर्म से ना एक सोच से, देश चलता है संविधान से', 'नको ताई घाबरू, चल सविधान राबवू', 'संविधान के रचनाकार, बाबासाहेब की जयजयकार', अशा घोषणा देऊन वातावरण उत्साहाने प्रफुलित केले.


त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले आणि भारतीय संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. सविताताई लाकडे मॅडम, प्रभारी मुख्याध्यापिका यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकेतून संविधान दिन आयोजनाचे महत्त्व विषद केले.


  सतिश शिंगाडे सर यांच्या संकल्पनेतून संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी मधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस दिल्या जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतिश शिंगाडे सर तर आभार प्रदर्शन कुमारी धनश्री तोडासे हिने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने