कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पोस्टरला मारले जोडे
चंद्रपूर:- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चंद्रपूर महानगर भाजपच्या (BJP) वतीने शहरातील महात्मा गांधी चौकात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे विरोधात तीव्र आंदोलन करीत कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पोस्टरला निळी शाई लावली व जोडे मारले. तसेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी विरोधात तिव्र घोषणाबाजी देखील केली. या आंदोलनात भाजपा महिला कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला दुग्धाभिषेक केला.
भारत जोडो यात्रेदरम्यान (Congress) कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास सांगताना त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. यात चंद्रपूर महानगर भाजपच्यावतीने गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून निळी शाई लावण्यात आली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात तिव्र निदर्शने करण्यात आली. भाजपा पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व तसे निवेदन पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना देण्यात आले. हे आंदोलन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व भाजपा पदाधिकारी, भाजयुमो पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत