कळले नाही कसे मला
तुझ्यात नकळत गुंतले
गंध तुझ्या प्रितीचा असा
त्यात मी अलगद बहरले ...1
प्रीत माझी साधी भोळी
जेव्हा मी तुला पाहिले
हरवून गेले तुझ्यात मोहना
मी न माझेच राहिले....2
तुझ्या नजरेचा इशारा
न बोलता सर्व कळले
माझे प्रेम तुझ्यावर हे
तुझ्या इशार्याने जुळले ...3
बघताच तुला होतो हर्ष
तन मन तुलाच वाहिले
गंध तुझ्या प्रितीचा हा
तुलाच मनात बसविले...4
प्रेम तुझ्यावर किती हे
शब्दात समोर मांडले
समजून घे मला सखे
तुझ्यासाठीच भांडले...5
*हर्षा भुरे, भंडारा*