Top News

पक्षी सप्ताहनिमित्त इको-प्रो तर्फे कार्यक्रमाचे आयोजन #Bird


इको-प्रो पक्षी संवर्धन विभागाचा उपक्रम

चंद्रपूरः- पक्षी सप्ताह निमित्त इको-प्रो संस्थे तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक किर्तीचे जेष्ठ पक्षीतज्ञ डाॅ सलिम अली व महाराष्ट्रातील पक्षीतज्ञ अरण्यऋषी श्री. मारूती चितमपल्ली यांच्या जन्मादिनाचे औचित्य साधत 5 नोव्हे ते 12 नोव्हे यादरम्यान ‘पक्षी सप्ताह’ साजरा केला जातो. या दरम्यान इको-प्रो संस्थेच्या पक्षि संवर्धन विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यात इको-प्रो सदस्यासोबत समाजकार्य महविद्यालय पडोली चे विद्यार्थी सुध्दा सहभागी झाले होते.
विदयार्थ्यांना पक्षी सप्ताह व पक्ष्यांचे निसर्गात महत्व यावर बंडू धोतरे यांचे मार्गदर्शन

पक्ष्याचे निसर्गात महत्वाचे स्थान असुन आपल्या सभेावताल पक्ष्यांचा उत्तम अधिवास असुन त्याचा योग्य अभ्यास करून प्रत्येक विदयाथ्र्याने संरक्षण व संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहीजे.-मारूती चितमपल्ली संराची शाळेत असतांना पाठयक्रमातील पक्षी, वन्यप्राणी, जंगल याबदद्ल माहीती मिळत होती, आज विकासाची गतिमान वाटचाल यामुळे अनेक पक्षी, प्राणी, वन्यजीव संकटग्रस्त होत आहेत, त्यांचा अधिवास नष्ट होत आहे, अश्या परिस्थितित एकंदरित निसर्ग संवर्धनाकरिता नवी युवा पीढी अधिक सजग असणे आवश्यक असून याबाबत अधिक विद्यार्थ्यांनी जाणुन घेण्याची गरज आहे
पक्ष्याचे नैसर्गिक अधिवास, स्थलांतरित पक्षी मुक्कामी येणारे तलाव, जलाशय परिसरात होणाऱ्या पार्टी व भोजन कार्यक्रमामुळे सर्वत्र प्लास्टीकचे प्लेट, वाटया, ग्लास तसेच खाद्य पदार्थाचे वेष्टन यामुळे परिसरात मोठया प्रमाणात प्लास्टीकचा खच पडलेला असतो, याठिकाणी प्लास्टीकचे प्रदुषण मोठया प्रमाणात झालेले असते, तलाव लगतच्या शेतात होणारे रासायनिक शेती, पक्ष्याची शिकार आदि अनेक कारनामुळे पक्षी अधिवास धोक्यात आहेत. शहरातील कांक्रीट च्या घरामुळे मानवी वसाहतीत आढळनारी चिमनी सुद्धा आता दिसून येत नाही.
आज पक्षी सप्ताह निमित्त पक्षी अधिवास, पर्यावरणमधे त्यांचे महत्व, संरक्षण, जनजागृति विषयी अनेक उपक्रम आदि विषयी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी विदयर्थ्यांना मार्गदर्शन केले. या पक्षी सप्ताह निमित्त जूनोना तलाव येथे पक्षी निरीक्षण कार्यक्रम व तलाव परिसर स्वच्छता अभियान सुद्धा राबविले जाणार आहे. इको-प्रो भद्रवती शाखा तर्फे संपूर्ण सप्ताहभर कार्यक्रम आयोजन केले जात आहे. आजच्या कार्यक्रम करिता राजू काहीलकर, अस्मिता मेश्राम, युवराज बांबोले, चित्राक्ष धोतरे यांचेसह समाजकार्य महाविद्यालय पडोली चे शंभर अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने