कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात #accident


सावली:- सावली तालुक्यातील सोनापुर सामदा मार्गावर कारचालकाचा कार वरील ताबा सुटल्याने कारचा अपघात घडला. मात्र सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही.

सविस्तर वृत्त असे की, सचिन प्रभाकर कुकडे , वय 35 वर्ष रा. सोनापुर असे कार चालकाचे नाव आहे. सोनापुर- रस्त्यावरून एक कार (क्र.MH- 34 AA-8539) सामदा- व्याहाड च्या दिशेने सचिन प्रभाकर कुकडे आपल्या मुलीला कू. आराध्या कुकडे हिला स्कूल ऑफ स्कॉलर विद्यालयात उशीर होऊ नये म्हणून आपल्या कारने घेउन जात असताना नागोबा देवस्थानच्या थोड्या अंतरावर वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूच्या खड्डयात कोसळली. त्यात कारचा पूर्ण चुराडा झाला.

सदर घटना हि सकाळी 7: 00 घडली असून सकाळीं फिरायला गेलेल्या युवकांच्या समोर घडली असल्याचे गाडीतील जखमींना उपचारासाठी व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. आणि तेथूनच त्यांना जिल्हा रुग्णालय गडचिरोलीला हलविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या