Top News

शिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday



पोंभुर्णा:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चेक आष्टा ही दिनांक 02 डिसेंबर 1958 रोजी स्थापन करण्यात आली. झोपडीत भरणारी दोन वर्गाची ही शाळा आज आठ वर्गापर्यंत गतिमान झाली. या शाळेचा विकास आणि या शाळेची गनिमा कायम रहावी म्हणून हा स्थापना दिवस साजरा केला जातो.


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चेक आष्टा शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापले वर्ग सजावट केले. तसेच सकाळी संपूर्ण परिसर स्वच्छ करून फूलांनी रांगोळ्या काढल्या. इमारतींना फूलांच्या माळांनी, तोरण, फुग्यांनी सजवले. या कार्यात शाळेतील शिक्षकांनीही उत्साहाने सहभाग घेतला.


प्रमुख अतिथींचे स्वागत व मार्गदर्शन झाल्यानंतर इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा भेट दिल्या. तसेच इयत्ता ८ वीच्या विद्यार्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर मूर्ती आणि ताजमहाल मूर्ती भेट दिले. त्यानंतर केक कापून शाळेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. व चॉकलेट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सौ. सरिताताई मरस्कोल्हे सदस्या ग्रामपंचायत चेक आष्टा या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर मरस्कोल्हे, सदस्य शा. व्य.स. चेक आष्टा, कु. सविता लाकडे मॅडम, प्र. मुख्याध्यापिका, सुरज मडपती, स्वयंसेवक इ. १ ते ५ वी, सौ. सरिताताई शेडमाके, सतिश शिंगाडे सर, विनोद पोगुलवार सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. सविता लाकडे मॅडम यांनी केले. सुत्रसंचालन इयत्ता ८ वीच्या विद्यार्थीनी कु. तनिषा बोंडे, कु. शिवानी येरमे यांनी केले तर कु. चांदणी पोतराजे हिने आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. लाकडे मॅडम, प्र. मुख्याध्यापिका, शिंगाडे सर, पोगुलवार सर, शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने