Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

चंद्रपूर जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राइव्हची मोहीम #chandrapur #chandrapurpolice #police


वाहनचालकांनी ड्रंक अँड ड्राइव्ह करू नये, चंद्रपूर पोलिसांचे आवाहन


चंद्रपूर:- दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याने सदर उत्सव साजरा करण्याकरीता अतिउत्साही तरुणमंडळी मद्य प्राशन करून दुचाकी/चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रश ड्रायव्हिंग स्टंटबाजी सारखे कृत्य करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातासारखे प्रकार पडून जिवितहानी होत असते त्यामुळे सदर प्रकारावर आळा घालण्याचे दृष्टीने दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी पासुन ते दिनांक ०१/०१/२०२३ पर्यंत संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे.

तरी सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, कोणीही मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही, जर मद्य प्राशन करून वाहन चालवितांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपुर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकावर मोठ्या प्रमाणात ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह ची विशेष मोहीम घेवून कडक अमलबजावणी करण्यात येणार आहे. तरी नववर्षाचे स्वागत करतांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची सर्व नागरीकांनी दक्षता घ्यावी. याबाबत पोलीस निरीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील वाहतुक शाखा चंद्रपुर यांनी आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत