महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा अहेरीच्या तालुका अध्यक्षपदी मिलिंद खोंड तर सचिवपदी अनिल गुरनुले यांची निवड #chandrapur #gadchiroli #Aheriअहेरी:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा अहेरीच्या तालुका अध्यक्षपदी मिलिंद खोंड तर सचिवपदी अनिल गुरनुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी आसिफ पठाण ,अखिल कोलपाकवार कोषाध्यक्ष पदी अमोल कोलपाकवार,सहसचिव पदी रामू मादेशी ,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

आल्लापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात रविवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत नवीन कार्यकारिणी पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे,पूर्व विदर्भ संघटक श्रीधर दुग्गीरालापाठी,गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रुपराज वाकोडे,जिल्हा सल्लागार ओमप्रकाश चुनारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

यावेळी कार्यकारिणी सदस्या मध्ये रमेश बामनकर, स्वप्नील तावाडे,महेश येर्रावार,प्रशांत ठेपाले,उमेश पेंड्याला, शंकर मेश्राम,इस्रार शेख ,रफिक पठाण,अशोक आईनचवार ,स्वप्निल श्रीरामवार यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पदाधिकार्याचे वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत